नवी दिल्ली : सध्या Google Maps चा वापर अनेकांकडून केला जात आहे. त्यानुसार, कंपनीकडून अनेक फीचर्स देखील आणले जात आहे. पण, असे काही फीचर्स आहेत ते बहुतांश जणांना काहीच उपयोगाचे नाही. त्यामुळे त्याचा वापर करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.
Google Maps मध्ये My Timeline असे एक फीचर आहे. हे फीचर आपण कुठं-कुठं गेलो होतो याची नोंद ठेवतो. संपूर्ण दिवसाची माहिती हे फीचर ठेवते. या फीचरमध्ये ॲप युजर्सने ज्या-ज्या ठिकाणी भेट दिली याचा पूर्ण रेकॉर्डच असतो. दिलेल्या सर्व ठिकाणांची नोंद ठेवते. याचा अर्थ तुम्ही कुठे रोमिंग करत आहात याचा डेटा गुगलकडे आहे. अशा परिस्थितीत या फीचरमुळे अनेकांना त्यांचा डेटा लीक होण्याची भीती निर्माण होते.
तसेच यानुसार, लोक त्यांच्या वेळेची योग्य निवड करू शकतात. मात्र, हे फीचर योग्य माहिती देतेच असे नाही. म्हणजेच काहीवेळा Traffic जास्त नसतानाही एखाद्या ठिकाणाची चुकीची माहिती मिळू शकते. अशा परिस्थितीत हे फीचर युजर्सची दिशाभूल करू शकते.