सध्या जग स्मार्ट होताना दिसत आहे. त्यानुसार, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही यांसारख्या उपकरणांचा वापर केला जात आहे. त्यात स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हाच फोन वापरताना काही विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, योग्यवेळी लक्ष न दिल्यास फोनचा स्फोट होऊ शकतो.
स्मार्टफोन चार्जिंगला लावताना खबरदारी घेणे गरजेचे असते. तुम्ही स्मार्टफोन खूप वेळासाठी चार्ज करू नये. म्हणजेच रात्रभर फोन चार्जिंग लावून ठेवू नये. ज्यामध्ये फोन रात्रभर फुल चार्ज होऊन तापून त्याचा स्फोट होऊ शकतो. फोन पूर्णपणे चार्ज झाल्यावर तो लगेच चार्जिंगवरून काढा. फोन चार्ज होत असताना फोनचा वापर पूर्णपणे थांबवा.
आपला फोन नेहमी त्याच कंपनीच्या ओरिजिनल चार्जरने चार्ज करावा. कोणत्याही दुसऱ्या कंपनीचा किंवा लोकल चार्जरने फोन चार्ज करू नये. हे देखील फोनसाठी हानिकारक ठरू शकते. काही वेळा उत्पादनातील दोषामुळे फोनचा स्फोट होतो. अनेकवेळा फोनमध्ये दिलेल्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये बिघाड झाल्यामुळे फोनचा स्फोट होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची पुरेपुर काळजी घ्यावी.