नवी दिल्ली : सध्या Reliance Jio, Airtel आणि Vi या मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी त्यांचे टॅरिफ प्लॅन महाग केले आहेत. त्यामुळे सरकारी कंपनी असलेल्या BSNL मध्ये अनेक युजर्सने MNP केले. मात्र, आता याच खासगी कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन BSNL ने प्लॅन दर वाढवण्यासोबतच Validity मध्येही कपात केली आहे.
BSNL ने त्यांच्या एका लोकप्रिय प्लॅनची वैधता अर्थात व्हॅलिडिटी कमी केली आहे. BSNL चा 485 रुपयांचा प्लॅन आहे ज्याची व्हॅलिडिटी आधी 82 दिवसांची होती, पण आता कंपनीने त्याची वैधता 80 दिवसांपर्यंत केली आहे. मात्र, कंपनीने अतिरिक्त 40 जीबी डेटा देण्याची घोषणा देखील केली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा उपलब्ध होता आणि आता दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे.
दरम्यान, बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असणार आहे. असे जरी असले तरी या दरवाढीचा फटका आता हजारो मोबाईल युजर्सला बसणार आहे.