कोल्हापूर : राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नदी- नाले ओसांडून वाहत सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अशातच शिरोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बस्तवड- अकिवाट मार्गावर कृष्णा नदीचा पूल ओलांडताना ट्रॅक्टर उलटल्याने सात जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.
Maharashtra | A tractor crossing Krishna River in Ichalkaranji in Kolhapur District overturned and 7-8 people onboard got swept away in the stream. The NDRF team stationed at Shirol has moved to the location to conduct a search and rescue operation. Local authorities have already…
— ANI (@ANI) August 2, 2024
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बस्तवाड आकिवाट मार्गावर धरण पूल असून या पुलावरून सकाळी नऊ वाजता शेतातील केळी काढण्यासाठी एका ट्रॅक्टरमध्ये बसून सात जण निघाले होते. नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आला असता पाण्याला ओढ असल्याने ट्रॅक्टर रस्ता सोडून नदीपात्राच्या दिशेने सरकू लागला यादरम्यान ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट नदीच्या पात्रात उलटला.
यामध्ये असलेले सात जण वाहून गेले आहेत. यातील दोघांना रेस्क्यू फोर्सच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र अन्य पाच जण बेपत्ता आहेत. ही घटना आज सकाळी (शुक्रवारी) साडे नऊच्या सुमारास घडली आहे.
शिरोळ येथे तैनात असलेले एनडीआरएफचे पथक शोध आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले, अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे. पाण्यात बुडालेल्या सातजणांपैकी तीन जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, अजूनही पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.