Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साताऱ्यात शिक्षक बदलीतील गैरव्यवहार उघड; बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून लाभ घेतल्याप्रकरणी दोन शिक्षक निलंबित

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 5 August 2025, 8:26

सातारा: शिक्षक बदली प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात सातारा जिल्हा परिषदेने कठोर पाऊल उचलले आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करून लाभ मिळवल्याच्या आरोपावरून आता दोन शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार अनेक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा गैरवापर करून बदली आणि इतर लाभासाठी अर्ज केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन जिल्हा परिषदेने 581 दिव्यांग शिक्षकांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या तपासणीत दोन शिक्षकांनी शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले. या गंभीर फसवणुकीप्रकरणी प्रशासनाने संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. या कारवाईमुळे एकूण निलंबित शिक्षकांची संख्या आता 3 झाली आहे.

 

प्रशासनाने घेतली गंभीर दखल

  • सुरेखा प्रभाकर वायदंडे: कराड तालुक्यातील आगाशिवनगर येथील शिक्षिका सुरेखा वायदंडे यांनी बदलीसाठी 48 टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, त्यांची पुन्हा तपासणी केली असता, त्यांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण केवळ 16 टक्के आढळले. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
  • श्रीकांत विष्णू दोरगे: माण तालुक्यातील काळेवाडी येथील उपशिक्षक श्रीकांत दोरगे यांनी त्यांच्या मुलाचे 42 टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रमाणपत्राची फेरतपासणी केली असता, मुलाचे कर्णबधिरत्वाचे मूल्यमापन शून्य टक्के आढळले. त्यामुळे फसवणुकीच्या आरोपाखाली दोरगे यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

या दोन्ही प्रकरणांमुळे जिल्हा परिषदेने बनावट प्रमाणपत्रांबाबत कठोर भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

daund crime

Daund News : दौंडमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी ; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल तर तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार

Monday, 27 April 2026, 16:39

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:54
daund crime

Daund Fraud News : दौंडमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकऱ्याला 7 लाखांचा गंडा ; मुकादमावर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:51

Pune News : उरुळी देवाची येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून 6 लाखांहून अधिक ऐवज लंपास..

Monday, 27 April 2026, 13:41
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Fursungi News : “आयटी इंजिनिअर महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ ; 5 जणांवर गुन्हा दाखल..

Monday, 27 April 2026, 13:37

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीसह त्याच्या 9 साथीदारांवर नगर जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 12:55
Next Post

राजकीय घडामोडींना वेग! पिंपरी-चिंचवडमधील 32 प्रभाग रचनेचे नकाशे आज नगर विकास विभागाकडे करणार सादर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.