Solapur Politics: मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या (Anagar Panchayat Election) अध्यक्षपदाची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली आहे. निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच गावात जल्लोष सुरू झाला. याच वेळी माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटला आहे. (Solapur Politics Latest News)

काय म्हणाले होते Balraje Patil?
विजयानंतरच्या जोरदार सेलिब्रेशनदरम्यान बाळराजेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्यांनी कॅमेऱ्याकडे बोट दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिल्याचे दिसत आहे. कॅमेऱ्याकडे बघून “सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय,” असे बाळराजे पाटील म्हणाले. या वक्तव्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा: नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा घोळ उघड; शहरात गोंधळ, नेमकं काय घडलं?
माजी आमदार Rajan Patil काय म्हणाले?
दरम्यान, माजी आमदार राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर तसेच बाळराजे यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली आहे. विरोधक मुद्दाम अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राजन पाटील म्हणाले, “गावात आम्ही दिवंगत आर. आर. पाटील यांची संकल्पना राबवतो. कधीही निवडणूक न झालेल्या गावात ही निवडणूक होत असल्याने तरुण मुलगा उत्साहात बोलला असेल. त्याने केलेल्या वक्तव्याचे समर्थन मी करीत नाही.”
राजन पाटील पुढे म्हणाले, “तो राजकारणात अजून लहान आहे. त्याच्या तोंडून न कळत काही शब्द गेले असतील तर मी वडिल म्हणून शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागतो. दोन्ही नेत्यांचा आमच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. हा विषय इथेच थांबवावा.” असे राजन पाटील म्हणाले आहेत.
व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वातावरण तापले असले तरी माजी आमदार पाटील यांची माफी लक्षवेधी ठरत आहे.
हेही वाचा: पुण्यात निवडणूक जिंकण्यासाठी महिलांना लाखो रुपये वाटणार! उमेदवाराने थेट वर्ल्ड बँकेलाच लिहिलं पत्र







