पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधून एक बातमी समोर आली आहे. निवडणुकीतील (Local Body Election) महिला मतदारांची महत्वाची भूमिका लक्षात घेत मतदान आपल्याला पडावे यासाठी अजब मार्ग शोधला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने थेट वर्ल्ड बँकेला पत्र लिहित महिला मतदारांना पैसे वाटण्यासाठी आपल्याला कर्ज हवं आहे. असं म्हटल आहे. या उपरोधिक पत्राची चांगलीच चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. (Pimpri Chinchwad)

समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP Sharad Pawar) इच्छुक उमेदवार माधव पाटलांनी हे पत्र लिहले आहे. हे पत्र लिहण्यामागे देखील महत्त्वाचा उद्देश आहे असं माधव यांनी सांगितले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कर्जाची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, मी जेवढे कर्ज मागितले आहे ते माझ्या प्रभागातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मागितली आहे. महिलांना रोजगार मिळू दे असा माझा हेतू आहे. वर्ल्ड बॅंक मला नक्की कर्ज देईल असा विश्वास माधव पाटलांनी दर्शवला आहे.
बिहार राज्यात नुकतीच निवडणूका पार पडली. निवडणूकाआधी महिलांना प्रत्येक दहा हजार रुपये वाटण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर माधव पाटील यांनी ही शक्कल लढवली असणार असे बोलले जात आहे. पाटील यांनी सांगितले की, मला नोटा देऊन मत खरेदी करायची नाहीत आणि गैरपध्दतीने निवडणूही यायचं नाही. माझा फक्त एकच हेतू आहे, ज्यात महिलांना रोजगार मिळावा. त्यांनी आर्थिक सक्षमीकरण व्हावं. या उद्देशाने मी ३० कोटींची मागणी वर्ल्ड बॅंकेकडे केली आहे.







