Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजप नेत्याच्या मुलाचा प्रताप..! कोट्यवधींच्या कर्जातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी स्वतःच्याच अपघाती मृत्यूचा रचला कट; पोलिसांनी ‘असा’ केला पर्दाफाश… 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 18 September 2025, 16:32
Shirdi Crime: BJP leader's son's glory..! He plotted his own accidental death to get rid of a debt worth crores; Police 'unmasked'...

Photo-Social Media

Shirdi Crime: भाजप नेते महेश सोनी (Mahesh Soni) यांचा मुलगा विशाल सोनी याने कोट्यवधींच्या कर्जातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आपल्या अपघाती मृत्यूचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या बनावाचा पर्दाफाश केला असून, विशालला महाराष्ट्रातील शिर्डी आणि शनी शिंगणापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

 

घटना काय? (Shirdi Crime)

5 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास राजगड पोलिसांना कालीसिंध नदीत एक कार कोसळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मच्छिमारांच्या मदतीने कार नदीतून बाहेर काढली. मात्र, गाडीत कोणीही आढळून आले नाही. तपासात ही कार भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा विशाल याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. मात्र विशाल बेपत्ता असल्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले.

त्यानंतर विशालचा शोध घेण्यासाठी एसडीईआरएफचे पथक मागवण्यात आले होते.  या पथकाकडून आजूबाजूच्या परिसरात शोध मोहिम राबवण्यात आली. मात्र दहा दिवस उलटूनही विशालचा  मृतदेह आढळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रीत केले.

विशालच्या  मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) तपासणीतून विशालचा मोबाइल महाराष्ट्रात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिस तपासात विशालने कबुली दिली की, त्याच्यावर 1 कोटी 40 लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. त्याच्याकडे सहा ट्रक आणि दोन प्रवासी वाहने असून, आर्थिक अडचणींमुळे तो कर्ज फेडू शकत नव्हता. कुटुंबातील काही सदस्यांच्या सल्ल्याने त्याने मृत्यूचा बनाव करण्याचा निर्णय घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

बनाव कसा रचला ?

5 सप्टेंबर रोजी पहाटे  5 वाजता विशालने गोपाळपूराजवळील ढाब्यावर थांबून एका ट्रकमधून भाडे घेतले आणि नंतर स्वतःच्या कारमध्ये बसून नदीकाठी गेला. त्याने कारचा हेडलाईट बंद करून ती हळूहळू चालवत नदीकाठी घेऊन आला. त्यानंतर त्याने गाडी नदीत ढकलली. पूलावर संरक्षक कठडा नसल्यामुळे कार थेट नदीत कोसळली. यानंतर तो एका ड्रायव्हरच्या बाईकवरून ढाब्यावर परतला आणि लगेचच इंदूरला जाणाऱ्या बसने पसार झाला.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात स्वतःच्या ‘मृत्यू’ची बातमी वाचून विशाल महाराष्ट्रात आला. काही दिवस शिर्डी आणि शनी शिंगणापूर परिसरात वास्तव्यास होता. मात्र पोलिस त्याचा तपास करत असल्याचे लक्षात येताच त्याने दुसरा बनाव आखण्याचा प्रयत्न केला.

तपास चुकवण्यासाठी विशालने स्वतःचे कपडे फाडले, अंगावर धूळ लावली आणि अपहरण झाल्याचा देखावा करत फर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांकडे आधीच ठोस माहिती असल्याने काही क्षणांतच त्याचा कट उघडकीस आला.

या संपूर्ण प्रकारात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या गंभीर प्रकारानंतरही विशाल सोनीविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांकडून यासंबंधी अधिक चौकशी सुरू आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53
Next Post
Chakan News: Contractors clash in Chakan over tender process, brawl and suspicion of malpractice

Chakan News: निविदा प्रक्रियेवरून चाकणमध्ये ठेकेदार भिडले, हाणामारी अन् गैरव्यवहाराचा संशय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.