-सागर घरत
करमाळा : कोंढार चिंचोली येथे झोळ परिवार समर्थक ज्ञानेश्वर गलांडे यांची उपसरपंच म्हणून निवड झाली. त्यावेळी त्यांचा सत्कार प्रा. रामदास झोळ व माया झोळ यांनी केला. यावेळी कोंढार चिंचोली गावचे सरपंच शरद भोसले, तसेच अनिल डफळे, प्रकाश गलांडे, मनोज साळुंखे, भरत लांडगे, चंद्रशेखर जगताप, ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रा. रामदास झोळ म्हणाले की, करमाळा तालुक्यातील विविध समस्या जसे की वीज, रस्ते, पाणी त्याचबरोबर शिक्षण व आरोग्य या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यापुढे असेच आपण करमाळा तालुक्यात समाजकारणाबरोबर राजकारणातही सक्रिय सहभागी राहणार आहोत असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता जोमाने कामाला लागण्यास प्रा. रामदास झोळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शित केले. इथून पुढे करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे यशाच्या शिखरावर पोहोचण्याकरिता आपणास करमाळा तालुक्यातील विविध समस्यांवर निवारण काढण्यास भर दिला पाहिजे. तसेच कुठल्याही गटा तटात न अडकता निस्वार्थपणे करमाळा तालुक्यातील समस्या सोडविण्यात सहभागी झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी कोंढार चिंचोलीचे सरपंच शरद भोसले व उपसरपंच ज्ञानेश्वर गलांडे यांनी प्रा. रामदास झोळ व प्रा. माया मॅडम यांचे आभार व्यक्त केले.