Satara News : कऱ्हाड : साताऱ्याच्या कऱ्हाड भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात १२ डिसेंबर रोजी वाघाचे पायाचे ठसे मिळाले. फिरत्या वनरक्षक व वनमजूर याच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने सदर बाब वनक्षेत्रपाल यांना कळवली.
मााहिती मिळताच वाघाची छायाचित्रे कैद करण्यासाठी मोहीम आखली गेली. जबरदस्त गस्त घालण्यात आली. पुढे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पायांचे ठसे व विष्टा सापडल्या.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल परिसरातील वन विभागाने लावलेले कॅमेरा तपासणी केले असता तिथे वाघाचा संचार असल्याचे सत्य समोर आले. १७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजून ५९ मिनीटांनी वाघाचे छायाचित्र त्या कॅमेऱ्यात कैद झाले. सुदैवाने तो जंगल परिसरात फिरत होता. नागरिवस्ती पासून तो लांब होता. ती बाब ही अत्यंत आशादायी आहे व सर्व व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी वर्ग यांना सतर्क करण्यात आले आहे.