सांगली : जगभरात हवेच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचं आपण पाहत आलो आहोत. अशातच केंद्रीय प्रदूषण मंडळाने एक अहवाल जाहीर केला आहे. यात राज्यात सांगली जिल्हा सर्वात आरोग्यदायी शहर ठरलं आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगलीतील हवा सर्वात चांगली समजली जात आहे. सांगली कोल्हापुरातील हवेची गुणवत्ती चांगली असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निरीक्षण आहे. या जिल्ह्यांचा समावेश आरोग्यदायी शहरांमध्ये होतो. सांगलीकरांच्या दृष्टीने ही अगदीच अभिमानास्पद बाब आहे. हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी जो मापदंड वापरला जातो. त्यानुसार 0 ते 50 या स्तरातील हवा सर्वात चांगली समजली जाते. येथील पर्यावरणात भरपूर ऑक्सिजन देणारी झाडे मोठ्या प्रमाणात असतात. तसेच तेथील औद्योगिक संस्थाही प्रयत्न पूर्वक हवेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड सारख्या वायूंचे हवेत उत्सर्जन करणे टाळण्यासाठी प्रयत्न करतात. तेथील प्रदूषणाची पातळी आटोक्यात असते.
हिवाळ्यात दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातल्याही अनेक शहरात हवा खराब होताना दिसत आहे. विशेषत: मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि आसपासच्या शहरांमध्ये जेथे सातत्याने बांधकामासंबंधित काम होतात, तेथील हवेचा दर्जा हा घसरत चालला आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे. अशातच आता सांगली सर्वात आरोग्यदायी शहर ठरले आहे.
वाढत्या औद्योगिककरणामुळे, वाहतुकीमुळे, शहरांच्या प्रदूषण पातळीने कमालीची मर्यादा ओलांडली होती. दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबईतील चेंबूर सारख्या ठिकाणी तर गॅस चेंबरसारखी अवस्था झाली होती. सकाळच्या वेळी हे प्रदूषण अगदी धुक्यासारखे पसरलेले डस्ट अशी परिस्थिती निर्माण होते. पण आता महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रणात येऊ लागले असल्याचे चित्र आहे.