सोलापूर : आता सरकार लाडक्या गाईला महिनाकाठी दीड हजार रुपये अनुदान देणार आहे. गोशाळेत असणाऱ्या देशी गाईला पैसे देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे सर्वेक्षण सुरू झाले आहे.
केंद्र शासनाने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. यामुळे गाईच्या हत्या थांबणार आहेत. देशी गाईचे संवर्धन होण्यासाठी शासनाने महिनाकाठी एका गाईला दीड हजार अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. गोशाळेत असणाऱ्या देशी गाईला हे अनुदान मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषद व राज्य पशुसंवर्धन विभागाने सर्वेक्षण सुरू केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांनी दिली. देशी गाईमध्ये कोणकोणत्वा गाई समाविष्ट होतात ते पाहणे गरजेचे ठरणार आहे.
भारतात जवळपास ६१ प्रकारच्या देशी गाई आढळतात. प्रत्येक राज्यानुसार गाईंचे वैशिष्ट्य वेगळे आहे. भारतातील गायींचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगितेप्रमाणे करण्यात आले आहे. दूध उत्पादनासाठी सहिवाल, रेड सिंधी, गिर, हरियाणा, शेती कामासाठी खिल्लारी, गवळाऊ, कांगायम, डांगी तर दुहेरी उपयोगासाठी थारपारकर, देवणी, ओंगोल, हरियाणा यापैकी काही महत्वाच्या जार्तीची वैशिष्ट्ये आहेत. याबाबतचा अधिक माहिती येत्या काही दिवसात उपलब्ध होईल, असे यावेळी सांगण्यात आले. राज्यात विविध जातींच्या गाई आहेत. याबाबतचे सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.