पुणे प्राईम न्यूज: एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक केली असल्याचे निरीक्षण पीएमएलए कोर्टाकडून नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पीएमएलए कोर्टाने दोषी मानल्यामुळे आता त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागाणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे निरीक्षण पीएमएलए कोर्टाकडून नोंदवण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांचे सीए महेश गुरव याचा जामीन अर्ज फेटाळताना पीएमएलए कोर्टाने मुश्रीफ यांच्या बद्दल हे निरीक्षण नोंदवले आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केल्याचे निरीक्षण न्यायालयाच्या वतीने नोंदवण्यात आले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणावरील सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं हसन मुश्रीफ यांचे पीए आणि निकटवर्तीय असणारे महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यापूर्वी पीएमएलए कोर्टानं हसन मुश्रीफ यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता त्यांचे सीए मेहश गुरवही अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.
महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए कोर्टानं फेटाळल्यानंतर आता याप्रकरणी मंत्री मुश्रीफ यांच्या तीन मुलांनीही अटकपूर्व जामीनासाठीचा मार्ग आणखी कठीण होत असल्याचं दिसत आहे. याप्रकरणी या सर्वांनी मिळून गैरव्यवहार केल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलं आहे. त्यामुळे याप्रकरणात कोणालाही अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा:
भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू
Pune News : शेतात राबणाऱ्या हातांना पोलिस भरतीत यश ; ललिता झाली मुंबई शहर पोलीस चालक..
Shirur News : कवठे ग्रामपंचायत मधील रिक्त पदाची पोटनिवडणूक जाहीर..