Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

किडनॅप करून लग्न केलं, घरात कोंडून ठेवायचा: आशाराणीची हत्या की आत्महत्या? कुटुंबियांचे धक्कादायक खुलासे…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 June 2025, 19:18

सोलापूर: राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सुरु असतांनाच सोलापुरातून आणखी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे राहणाऱ्या २२ वर्षीय आशाराणी भोसले या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असली, तरी तिच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा थेट आरोप केला आहे. विशेष म्हणजे आशाराणीच्या बहिणीने या प्रकरणात थेट तिच्या पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

सततच्या छळाला कंटाळून जीवन संपवलं?

आशाराणी भोसले यांचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले हे तिला सतत पैशासाठी आणि चारचाकी वाहनासाठी छळत होते, असा दावा तिच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे. आशाराणी केवळ २२ वर्षांची असून तिच्या मागे तीन वर्षांची मुलगी आहे. विशेष म्हणजे ती सध्या तीन महिन्यांची गर्भवतीही होती.

आशाराणीच्या कुटुंबीयांच्या मते, ही आत्महत्या नसून तिचा योजनाबद्ध खून आहे. यापूर्वीही सासरच्या मंडळींनी तिला विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी प्रकरण मिटवले गेले, मात्र त्यानंतरही तिला मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता. या सगळ्याला कंटाळूनच तिने अखेरचा टोकाचा निर्णय घेतल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

 

“ही आत्महत्या नाही, हत्या आहे”

आशाराणी भोसले यांची बहीण उषाराणी हिने माध्यमांसमोर आणि पोलिसांसमोर केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. “मी देखील त्याच घरात राहत होते. पण सासूच्या अत्याचाराला कंटाळून मी तिथून बाहेर पडले. माझ्या बहिणीवरही तसाच छळ सुरु होता. तिचा नवरा खूप संशय घेणारा होता. तो तिला मोबाईल वापरू देत नव्हता, घराबाहेर जाताना बाहेरून दरवाजा लावत होता. ‘पहिली मुलगी माझी नाही’ असा आरोप करत तिचा मानसिक छळ करत होता,” असे ती म्हणाली. तिच्या मते, आशाराणी इतकी आत्मविश्वासी होती की आत्महत्या करेल, हे अशक्य आहे. “गळफास लावलेलं ठिकाण इतकं उंच होतं की तिचा हात तिथपर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे ही आत्महत्या नाही, हत्या आहे,” असा दावा उषाराणी हिने केला आहे.

किडनॅप करून लग्नाचा आरोप

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आशाराणी आणि उषाराणी या दोघी बहिणी एका घरात दिल्या गेल्या होत्या. परंतु कुटुंबीयांचा आरोप आहे की, आशाराणी हिला जबरदस्तीने, म्हणजेच किडनॅप करून तिचे लग्न लावण्यात आले होते. त्यामुळे या नात्याला तिच्या मनात फारसा आदर नव्हता, आणि तिच्यावर सुरू असलेला छळ तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला होता.

तीघांना अटक, गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणातील मुख्य आरोपी पवन भोसले याला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले यांनाही अटक करण्यात आली आहे. तिघांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 80(2), 115(2), आणि 3(5) नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून शवविच्छेदनाचा अहवाल, घरातील साक्षी, आणि परिस्थितिजन्य पुरावे यावरून तपासाचा पुढील दिशा ठरणार आहे. आशाराणीच्या मृत्यूनंतर तिच्या लहान मुलीचा आणि अजून न जन्मलेल्या बाळाचा काय होईल, याबाबतही समाजात चिंता व्यक्त होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम; संदीप भोंडवे यांचे प्रतिपादन 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp