Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 16:16

पुणे : भारताचा अनुभवी लेग-स्पिनर युझवेंद्र चहल याने प्रथम-श्रेणी (रेड-बॉल) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत त्याने या निर्णयाची माहिती दिली. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचे आपले स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्याने व्यक्त केली, तरीही रेड-बॉल क्रिकेटने आपल्याला संयम आणि संघर्ष करण्याची ताकद दिली असे त्याने आवर्जून सांगितले.

जरी चहलने प्रथम-श्रेणी क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये सक्रिय राहणार आहे. भारतीय संघात एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये पुनरागमन करण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. देशासाठी पुन्हा मैदानात उतरण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

युझवेंद्र चहलच्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने 2009 मध्ये हरियाणा संघाकडून पदार्पण केले होते. एकूण 49 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 32.27 च्या सरासरीने 148 बळी टिपले आहेत. नुकत्याच झालेल्या 2026 च्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन-2 मध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि 16.14 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या. मिडलसेक्सविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर खेळलेला सामना हा त्याच्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.

हरियाणाकडून खेळताना चहलने 2016-17 च्या रणजी ट्रॉफी हंगामात अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्या मोसमात 7 सामन्यांत त्याने 22.60 च्या सरासरीने 33 बळी घेतले होते. त्यानंतर मात्र त्याला लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये मर्यादित संधी मिळाल्या.

 

भारतीय संघासाठी चहलने अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. परंतु, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चमकदार राहिली आहे. त्याने भारतासाठी 72 एकदिवसीय आणि 80 टी-20 सामने खेळले आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

सध्या चहल व्यावसायिक क्रिकेटमध्ये पूर्णपणे सक्रिय आहे. आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून त्याचा मोठा दबदबा आहे. आगामी काळातही तो पंजाब किंग्स संघाकडून आपली फिरकीची जादू दाखवताना दिसेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21
Next Post

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp