लोणी काळभोर, ता. 4 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून देशात विकास केला आहे. सबका साथ , सबका विकास हे धोरण स्वीकारून देशात अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यांच्यामुळे खेड्यांमध्ये मुलभूत सुविधांसह विकासाची गंगा वाहिली आहे. या योजनांचा शेतकरी, महिला व विद्यार्थी वर्गाला मोठा फायदा झाला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हवेली भाजपा सुद्धा बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टी हवेली तालुका व लोणी काळभोर शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने “रोजगार प्रशिक्षण मेळाव्याचे” उद्घाटन संदीप भोंडवे यांच्याहस्ते बुधवारी (ता.4) करण्यात आले. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन भोंडवे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण काळभोर, विकास जगताप, श्रीकांत कांचन, एमआयटीचे प्रशासक सुदर्शन सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विकास जगताप म्हणाले, “देशात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे” हे यश आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ निश्चय, कठोर परिश्रम व विकासाचा दृष्टिकोन यामुळे शक्य झाले आहे. जगालाही हेवा वाटेल अशी कामगिरी त्यांनी करून दाखविली आहे.

यावेळी बोलताना प्रवीण काळभोर म्हणाले, आधुनिक हे युग स्पर्धेचे आहे. या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर केवळ शिक्षण व पदवी असून चालणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच एकच पदवी असलेले दोन वेगवेगळे लोक वेगवेगळे यश संपादन करू शकतात”.
दरम्यान, या मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 100 हून अधिक नागरिकांनी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. जर कोण उमेदवार प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी इच्छुक असेल तर त्यांनी 8983429001 या क्रमांकावरती संपर्क करा किंवा https://lms.kedman.in/portals/registration/browser/pune वरील लिंक वरती जाऊन गुगल फॉर्म भरावा. नोंदणी झाल्यानंतर सरकारी संस्थेमार्फत 3 महिने मोफत रोजगार प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांमधून नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होईल.
यावेळी उरुळी कांचन भाजपचे शहराध्यक्ष अमित कांचन, थेऊरचे माजी उपसरपंच भरत कुंजीर, नितीन टिळेकर, गणेश कोतवाल, सुनील गायकवाड, काळुराम कुरकुंडे, श्रीरंग लोखंडे, संगीता काळभोर, सविता वर्मा, राजेंद्र हजगुडे, विशाल वेदपाठक, संकेत काळभोर, सोनू काळभोर, विराज चिले, अनिकेत दुगाणे, किरण नायर, भरत पाठक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश काळभोर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार भाजपा हवेली तालुका अध्यक्ष गणेश चौधरी यांनी मानले.







