Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 2 October 2026, 15:42

आळंदी : रायगडमधील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील 11वी आणि 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. विनर्स अकॅडमीच्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने आळंदी शहरासह दिवेआगर परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेनंतर आळंदी नगरपरिषद प्रशासनाने शहरातील कोचिंग क्लासेस आणि विविध आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. याच मोहिमेदरम्यान विनर्स अकॅडमीचा कारभार आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असल्याचे आढळून आल्याने नगरपरिषदेने संबंधित इमारतीवर कारवाई केली.

नगरपरिषदेच्या विशेष पथकाने श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या मालमत्तेची पाहणी केली. या ठिकाणी विनर्स अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे आढळले. त्यानंतर नगरपरिषदेच्या नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये अकॅडमीकडे व्यवसाय परवाना किंवा आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) नसल्याचे समोर आले.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता क्लासचा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे नगरपरिषदेने तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या निर्देशानंतर कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी पोहोचले.

 

पोलीस बंदोबस्तात विनर्स अकॅडमीच्या इमारतीला सील करण्यात आले. या कारवाईनंतर आळंदी शहरातील इतर कोचिंग क्लासेस आणि आस्थापनांचीही तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातील सर्व शिक्षण संस्था आणि खासगी क्लासेसनी आवश्यक परवाने घेऊनच व्यवसाय करावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या या कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात असून, शहरातील इतर क्लासेसच्या परवानग्यांचीही तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53

पुण्यात भाईगिरीचा प्रकार! ‘तू लय मोठा झाला का? माझ्याशी दुश्मनी परवडणार नाही” म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडत मारहाण..

Saturday, 3 October 2026, 17:46
Next Post

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp