वैराग : समृद्धी ऑरगॅनिक फार्म प्रायव्हेट लिमिटेड शेतकऱ्यांसाठी संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी भरपूर उपाय योजना राबवत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभरातून सेंद्रिय उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा शेतकरी बांधवानी फायदा घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कंपनीचे सर्वेसर्वा व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोरणकर यांनी केले.
समृद्धी ऑरगॅनिक फार्म प्रायव्हेट लिमिटेड पुणे अंतर्गत जैविक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सुर्डी (ता. बार्शी) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. 04) करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मोराणकर बोलत होते.
यावेळी व्यवस्थापक सचिन मेसरे, धीरज पाटील व प्रशिक्षण अधिकारी भास्करजी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेंद्रिय खा निरोगी राहा’ कंपनीच्या ब्रीद वाक्यानुसार प्रशिक्षणा दरम्यान लक्ष्मण शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात कंपनीचे प्रशांत मिसाळ, अर्चना आगलावे गट प्रमुख यांनीही विशेष सहकार्य केले.
जैविक उत्पादनाच्या खरेदीसाठी जिल्हा ठिकाणी शेतकरी खरेदी सुविधा केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच भारतामध्ये जैविक शेतीचे मोठ्या प्रमाणात फायदे व जैविक शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी 5% लिंबोळी अर्क कसे बनवावे. दशपर्णी अर्क, निंबोळी पेंड, जीवामृत, गोकृपा अमृत, ताम्र ताक, बेल रस कशे बनवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, उपस्थितांना कंपनी बद्दल पूर्ण माहिती देण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांना पश्चिम विघटन संस्कृतीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले व वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये निमगाव मगर परिसरातील सेंद्रिय शेती गटाचे प्रमुख पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.