बार्शी (सोलापूर) : बार्शी शहरापासून जवळ असलेल्या घारी गावात फटाका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कारखान्याला मोठी आग लागली आहे. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता हि घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना आहे. बार्शीतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे परिसर हादरला आहे. या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. आज वटपोर्णिमा असल्यामुळे या कारखान्यातील सर्व महिलांनी सुट्टी घेतली होती. त्यामुळे आज वटपोर्णिमा असल्यामुळे जिवितहानी झाली नाही. जर त्या महिला कारखान्यात असत्या तर भीषण प्रसंग ओढावला असता.
सकाळी कारखान्यातून स्फोटांचे मोठमोठे आवाज परिसरात ऐकू येऊ लागले. धुरांचे लोट परिसरात लांबच्या लांब दिसत होते. हा स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजूच्या परिसराला हादरा बसला. स्फोट झालेल्या त्या फटाका कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. परंतु शुक्रवारी वटपौर्णिमा असल्यामुळे पुजेसाठी या महिलांनी सुट्टी घेतली होती. कोणतीही महिला कामाला गेली नव्हती.
दरम्यान, कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की 5 किलोमीटरचा परिसर कंपनाने हादरला आहे. या स्फोटाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. कानठळ्या बनवणाऱ्या या स्फोटाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यातील एक स्फोट इतका भीषण होता, की कानठळ्या बसवणारा आवाज झाला. या स्फोटामुळे परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे नेमके कारण काय? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.