कोल्हापूर: पुण्यानंतर आता कोल्हापुरातही जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आता जीबीएसमुळे कोल्हापूरात दुसरा बळी गेल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील रेंदाळ ढोणेवाडी येथे राहणाऱ्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जीबीएस मृतांची संख्या आता 2 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ ढोणेवाडी येथे राहणाऱ्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. जीबीएस आजाराचा हा दुसरा बळी आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात या रुग्णावर उपचार सूरू होते. मात्र उपचारादरम्यानच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामध्ये सध्या जीबीएसच्या पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या पाच रुग्णांपैकी एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून आतापर्यंत जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.








