पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बीडमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. त्याला कारणही तसेच आहे. बीडमधील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये भेट घेतली आहे. या बंद दाराआडभेटीच नेमकं कारण काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..

जुन्नर बाजार समितीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या नेत्यांच्या गुप्त बैठका होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं असताना आता संदीप क्षीरसागर यांनी निधीबाबत आणि आगामी अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अनुषंगाने भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचाही भार असल्याने त्यांनीही भेट घेतली आहे.. दरम्यान दुसरीकडे अशी भेट बीड जिल्ह्यात किंवा मुंबईची घेता आली असती असा सवाल उपस्थित केला जात आहे.. दुसरीकडे या भेटीमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नाबद्दल चर्चा करण्यासाठी भेटलो असल्याचे सांगितलं.. तसेच त्यांच्यापुढे सामाजिक प्रश्नही मांडले असे ते म्हणाले…. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. विविध विकासकामांचं उद्घाटन अजित पवार करणार आहे. मात्र पालकमंत्रिपदाचा मुद्दा दादांच्या दौऱ्यात सुटणार का याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.. तसेच या दौऱ्यावरती ते कोणावर निशाणा साधणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..








