पाचगणी : सातारा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला. साबळे यांची पोलिस खात्यातील 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा पोलिस अधीक्षक समिर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, गृह पोलिस उपाधिक्षक अतुल सबनीस यांच्या हस्ते साबळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सहकुटुंब सत्कार केला.
राजेंद्र साबळे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. 1991 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सातारा जिल्हा पोलीस दलात भरती झाले. पोलिस मुख्यालय सातारा, पाचगणी, भुईंज, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा आदी पोलीस ठाण्यात त्यांनी प्रभावीपणे काम करून आपला ठसा उमटवला. साबळे यांनी पोलीस कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशी सेवा करत कायमच पोलीस दलाची मान उंचावण्याकरिता प्रयत्नशील राहिले.
वाहतूक शाखेत काम करत असताना साबळे यांनी 15 ते 20 लाखांचा अनपेड दंड रोखीत वसूल केल्याबद्दल त्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. साबळे यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना वेळोवेळी 120 रिवॉर्ड मिळाले आहेत. सहकारी पोलीस बांधव, वरिष्ठांशी व जनतेशी मनात कोणताही दुजाभाव न ठेवता सडेतोडपणे वागण्यात ते परिचित होते. सेवानिवृत्तीमुळे वाहतूक नियंत्रण शाखेत त्यांची कायम उणीव भासणार असल्याचे त्यांच्या सहकार्यांनी सांगितले.