सोलापूर: अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे, त्यांच्या पक्षाला मत म्हणजे मोदींनी आणलेल्या (Ajit Pawar) वक्फ कायद्याला समर्थन अशा (Narendra Modi) शब्दात एमआयएमचे (MIM) राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी (Asaduddin Owaisi) टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोलापुरात एमआयएमच्या उमेदवारांसाठी ओवैसी यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी महायुती आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली.

सोलापुरात अनेक जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएम असा सामना होत आहे. एमआयएमचे माजी शहराध्यक्ष आणि आताचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार तौफिक शेख यांच्या विरोधात असदुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली.

हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल
“सोलापूरला आपण पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोक इथं इतक्या वर्षांपासून आहेत, काहीच करत नाही. पाकिस्तानच्या घटनेत लिहलंय की एकाच धर्माचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो. एक दिवस असा येईल, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. तो दिवस बघण्यासाठी कदाचित मी जिवंत नसेन, पण हा दिवस एक ना एक दिवस नक्की येईल.”

अजित पवारांवर हल्लाबोल
अजित पवार आणि महायुतीवर टीका करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “देशाच्या संसदेत बोलणारा मी आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदीच्या गोदीत बसलेत. अजित पवारांना व्होट म्हणजे मोदींना व्होट. अजित पवारला व्होट म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काही घेणे-देणे नाही, पण आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही त्रिमूर्ती ही एकच आहेत. ते तुमच्यासमोर येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील, त्यांना मटपेटीतून उत्तर द्यावा लागेलं.”
‘स्पीडब्रेकर’ आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे ‘ग्रहण’ लावणार!
मी गरिबांसाठी काम करतो
एमआयएम गरिबांमुळे सुरू झाली, त्यामुळे गरिबांसाठी काम करते. कोणी तरी म्हटलं की माझ्या शेरवानीला हात लावणार. तुमचा जो राजकीय बाप आहे अजित पवार, त्याला समोर बसा म्हणा. तीन मिनिटात त्याला मुका नाही केलं तर सांगा अशा शब्दात ओवैसींनी अजित पवारांना आव्हान दिलं.







