Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बाळूमामांचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर मामावर लैंगिक शोषणप्रकरणी आणखी एक बलात्काराचा गुन्हा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 26 May 2026, 15:58

कुर्डूवाडी (सोलापूर) : स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसले उर्फ ‘मनोहर मामा’ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महिला भक्तेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात दुसरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

30 वर्षीय पीडित महिलेने 25 मे रोजी करमाळा पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी 2025 मध्ये आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने तिच्या एका मैत्रिणीने वडाचीवाडी (ता. हवेली) येथील मनोहर मामाच्या आश्रमात जाण्याचा सल्ला दिला होता. परिस्थिती सुधारेल, असे सांगत तिला आश्रमात नेण्यात आले.

 

फिर्यादीनुसार, पीडित महिलेने चार अमावस्यांच्या वार्‍या केल्या. चौथ्या अमावस्येनंतर मनोहर मामाचा सेवक ‘नाथबाबा’ याने पुढील मोठ्या पूजेसाठी करमाळा तालुक्यातील घोटी येथे येण्यास सांगितले. त्यानुसार 28 मे 2025 रोजी पीडिता घोटी येथील मठात पोहोचली. तेथे नाथबाबा, चालक आणि मनोहर मामा उपस्थित होते.

महिलेने पूजेसाठी 11 हजार रुपये दिल्यानंतर तिला एका खोलीत बसवण्यात आले. काही वेळाने मनोहर भोसले त्या खोलीत आला आणि पूजा करण्याच्या नावाखाली तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. महिलेने विरोध करून पूजा नको असल्याचे स्पष्ट सांगितले, तरीही मंत्रोच्चार करत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले, नाथबाबा आणि एका अनोळखी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. फौजदार ज्ञानेश्वर दळवी पुढील तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लंडनमधून फिरवतो पुण्याची सूत्र! ‘या’ ॲपवरून गुपचूप करायचा संपर्क; घायवळ बंधूंबद्दल धक्कादायक खुलासा

Wednesday, 10 June 2026, 14:24

जास्त प्रवाशांना बसवल्याने गोदावरीत बोट उलटली अन् 50 जण

Wednesday, 10 June 2026, 14:24

पूर्व पुण्यातील पाणीकपात रद्द; नागरिकांना दिलासा

Wednesday, 10 June 2026, 14:10

सासरच्या छळाला कंटाळून डाळिंब येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू-सासऱ्यासह 6 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 13:43

लोणी काळभोर येथील भरतनाट्यम ग्रुप देशात प्रथम, विद्यार्थ्यांची डान्स स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

Wednesday, 10 June 2026, 13:30

कामगाराने मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून मालकाला बेदम मारहाण, दूध डेअरीवर केला हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 13:16
Next Post

शेतकऱ्यांची चिंता वाढली! यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार? हवामान खात्याने वर्तवला नवा अंदाज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.