Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील भरतनाट्यम ग्रुप देशात प्रथम, विद्यार्थ्यांची डान्स स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 June 2026, 13:30

लोणी काळभोर, ता. १० : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत उत्सव’ नृत्य स्पर्धेत लोणी काळभोरच्या नटराज डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. संपूर्ण भारतातून सुमारे ३,५०० कलाकार सहभागी झालेल्या या स्पर्धेत अकॅडमीच्या भरतनाट्यम ग्रुप डान्सने प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला.

अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ पर्व-३ चे विजेते समर्पण लांबा यांची उपस्थिती होती. यावेळी अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनचे सचिव डॉ. प्रमोद ननवरे यांच्यासह देशभरातील हजारो स्पर्धक आणि कलारसिक उपस्थित होते.

या स्पर्धेत नटराज डान्स अकॅडमीचे प्रमुख सुयश सुरवसे यांना नृत्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय कलाक्षेत्रम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना सातत्याने राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देणाऱ्या सुरवसे यांच्या कार्याचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला.

सोलो डान्समध्येही विद्यार्थ्यांची चमक

 

स्पर्धेतील विविध गटांमध्ये नटराज डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामध्ये श्रेयश्री राऊत – द्वितीय क्रमांक, अजय वाघमारे – तृतीय क्रमांक, शरण्या लोंढे – तृतीय क्रमांक, समृद्धी लोंढे – तृतीय क्रमांक, प्रिन्सिका लोणकर – तृतीय क्रमांक, अद्विका फुलमंते – तृतीय क्रमांक मिळवला आहे . तसेच एकपात्री नाट्य स्पर्धेत थेऊर येथील अजय विजय वाघमारे याने द्वितीय क्रमांक मिळवत आपली वेगळी छाप पाडली.

व्हिएतनाममधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय स्तरावरील या यशानंतर नोव्हेंबर महिन्यात व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी नटराज डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, या यशामागे अकॅडमीचे प्रमुख सुयश सुरवसे यांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल लोणी काळभोर, थेऊर परिसरातील नागरिक आणि पालकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25
Next Post

सासरच्या छळाला कंटाळून डाळिंब येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू-सासऱ्यासह 6 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp