Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 31 August 2026, 8:34

मुंबई: राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून पुन्हा एकदा नाराजी समोर आली आहे. विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारमधील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. नव्याने महायुतीमध्ये सहभागी झालेल्या काही नेत्यांना मंत्रिपद मिळाले, मात्र आपण त्याकडे पाहत राहिलो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत खोत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केले. सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन फडणवीस यांनी मोठे नेतृत्व उभे केले, असे सांगत त्यांनी प्रस्थापित राजकीय घराण्यांवरही टीका केली.

फडणवीस यांच्यासमोर प्रस्थापित नेते येऊन उभे राहतात, हा बदलच आपल्या विचारांचा विजय असल्याचे खोत म्हणाले. मात्र, दुसरीकडे बाहेरून महायुतीमध्ये आलेले काही नेते सत्तेत महत्त्वाची पदे मिळवत आहेत आणि आपण मात्र केवळ पाहत आहोत, अशी बोचरी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यावेळी खोत यांनी काही नेत्यांच्या कथित आर्थिक कारभाराची चौकशी करण्याची मागणीही केली. बँका, सूतगिरण्या आणि साखर कारखान्यांशी संबंधित व्यवहारांची चौकशी करून त्याचा अहवाल सरकारने जनतेसमोर आणावा, अशी मागणी त्यांनी केली. काही प्रस्थापित नेत्यांमुळे ग्रामीण भागातील व्यवस्था कमकुवत झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

बँकेच्या संचालकपदावरूनही खोत यांनी राजकीय नेत्यांना टोला लगावला. बँकेच्या व्यवहारांकडे काही जण मोठ्या संधीच्या रूपात पाहतात, असा आरोप करत त्यांनी या व्यवस्थेवर मिश्कील शैलीत टीका केली.

दरम्यान, खोत यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे समर्थन केले. इथेनॉल उत्पादन आणि ऊस उद्योगाला चालना देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदाच्या वाटपावरून असलेली नाराजी आगामी काळात आणखी उघडपणे समोर येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरणात विनायक राऊतांचा संताप अनावर; वडिलांवर गंभीर आरोप,. ‘मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी……..

Wednesday, 23 September 2026, 17:07

सोरतापवाडी येथील ‘नीलकंठ मोटर्स’ मधून जुनी कार घेतली अन् डेंटिंग-पेंटिंगच्या नावाखाली परस्पर विकली; उरुळी कांचन पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:44

पेठ येथे विहिरीवरील मोटार सुरू करण्यावरून लोखंडी टाच्याने मारहाण ; चुलते व चुलत भावाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:36

‘आधी मोबदला द्या, मगच मोजणी करा’; लोणी काळभोरच्या शेतकऱ्यांचा महामार्ग भूसंपादनाला विरोध

Wednesday, 23 September 2026, 16:24

आईसोबतच्या प्रेमसंबंधाचा संताप अन् रक्तरंजित शेवट! मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची निर्घृण हत्या

Wednesday, 23 September 2026, 16:22

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मायमराठीचा डंका! ‘या’ मराठी सिनेमाने पटकावला राष्ट्रीय सन्मान

Wednesday, 23 September 2026, 16:02
Next Post

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp