सोलापूर : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिनही तरुण गाडी खाली चिरडून जागीच ठार झाले आहेत. काळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काल संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुण गाडी खाली चिरडून ठार झाले. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन तरुणांची नावं आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते.
यावेळी पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस आणि दुचाकीचा तांदुळवाडी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिनही तरुण एसटी बस खाली अडकले. एका तरुणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास 50 फूटांपर्यंत फरफटत गेले. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला धावून आले. तसेच त्यांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले असून जखमींना बार्शीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.