Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेजाऱ्यासोबत जुळले सूत, गोड बोलून त्याने कारमध्ये बसवले अन् माजी सरपंच महिलेची केली हत्या; कोल्हापूर हत्याकांडाचा उलगडा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 28 July 2026, 14:56

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरगाव येथे माजी सरपंच महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. या प्रकरणात महिलेचा शेजारी आणि कथित प्रियकर असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात दोघांमध्ये वैयक्तिक कारणांवरून वाद झाल्याची माहिती समोर आली असून, त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत महिलेचे नाव सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) असे असून त्या शिरगावच्या माजी सरपंच होत्या. त्यांचे पती दीड वर्षांपूर्वी निधन पावल्यानंतर आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील (वय 40) याच्याशी त्यांची जवळीक वाढल्याचे तपासात समोर आले आहे. दोघेही शेजारी राहत असल्याने एकमेकांची ओळख होती. काही काळानंतर दोघांमध्ये वैयक्तिक कारणांमुळे मतभेद निर्माण झाले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला पंढरपूरला जाण्याचे सांगून कारमध्ये बसवले. मात्र, त्यांना दुसरीकडे नेऊन गावाबाहेरील एका गोठ्यात गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून कारच्या डिकीत ठेवून तो भिवंडीकडे रवाना झाला.

 

दरम्यान, भिवंडी परिसरात पोहोचल्यानंतर आरोपीने आपल्या नातेवाईकाला फोन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत मागितल्याचे सांगितले जाते. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीने तातडीने पोलिसांना याबाबत खबर दिली. त्यानंतर नारपोली पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता डिकीत महिलेचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून वाहनही जप्त केले आहे. चौकशीदरम्यान वैयक्तिक वादातून हा गुन्हा केल्याची माहिती आरोपीने दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ बैठकीतील ५ मोठे निर्णय! दंडाच्या रकमेपासून ते थेट न्यायालयांच्या स्थापनेपर्यंत अनेक मोठे आणि धोरणातक निर्णय जाहीर

Tuesday, 28 July 2026, 16:21

‘इंग्रजी ही भीतीची नव्हे, संधींची भाषा’- सीईओ गजानन पाटील, लोणी काळभोरमध्ये ‘We Learn English’ उपक्रमाचे लोकार्पण

Tuesday, 28 July 2026, 16:16

इंदापूरमध्ये तब्बल ६ टन प्रतिबंधित आफ्रिकन मांगूर मासे जप्त; १९ लाखांच्या मुद्देमालासह दोघांवर कारवाईचा बडगा!

Tuesday, 28 July 2026, 16:01

लोणी रेल्वे स्टेशन परिसरात रंगला रम्मीचा अड्डा; पोलिसांच्या धाडीत 4 जण रंगेहात जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 15:49

नसरापूरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भयंकर प्रकार! ६५ वर्षांचा नराधम आणि ४ अन् १० वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी; दोघींना तोंड दाबून उचलून न्यायचा अन् आळीपाळीने…

Tuesday, 28 July 2026, 15:35

शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा जाळ्यात! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून अटक,SITचा मोठा प्रहार

Tuesday, 28 July 2026, 15:34
Next Post

"दादांना जाऊन ६ महिने झाले, आम्ही संयमाने वाट पहिली आता मात्र"; युगेंद्र पवार आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.