Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘इंग्रजी ही भीतीची नव्हे, संधींची भाषा’- सीईओ गजानन पाटील, लोणी काळभोरमध्ये ‘We Learn English’ उपक्रमाचे लोकार्पण

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 July 2026, 16:16

लोणी काळभोर, ता. २८ : “आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान ही काळाची गरज आहे. इंग्रजी ही भीतीची नव्हे तर संधींची भाषा आहे. ‘We Learn English’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीबाबत आत्मविश्वास निर्माण होईल. रेडिओ, मोबाईल अॅप आणि ध्वनीमुद्रित धड्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार इंग्रजी शिक्षण पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करतील,” असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेवरील पकड अधिक मजबूत व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच श्रवण, संभाषण, वाचन आणि आकलन या चार मूलभूत भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषद आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस (CLR) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘We Learn English’ या वर्षभर चालणाऱ्या अभिनव उपक्रमाचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. २७) लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ (मुलींची) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उपक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, लोणी काळभोरचे प्रशासक सरपंच नागेश काळभोर, उपसंचालक (डाएट) तथा प्राचार्य महेश शेंडकर, पूनम कडलक, वैशाली खाडिलकर, उपशिक्षणाधिकारी अस्मा मोमीन, विस्तार अधिकारी चंद्रकांत उगले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-2020) आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा (NCF-2023) यानुसार या उपक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ३,५२१ शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातील तीन दिवस दुपारी १२ ते १२.१५ या वेळेत इंग्रजीचे ध्वनिपाठ ऐकविण्यात येणार आहेत. या धड्यांचे प्रसारण पुणे विविध भारती १०१ एफएम तसेच प्रसार भारतीच्या NewsOnAir मोबाईल अॅपवर होणार असून, नेटवर्क नसलेल्या दुर्गम भागांसाठी ध्वनीमुद्रित (Recorded) धड्यांचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

 

कार्यक्रमात विद्यार्थिनींनी इंग्रजी स्टोरी टेलिंग, ‘Be the Best’ या कवितेचे प्रभावी सादरीकरण, इंग्रजी स्वागतगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनींचा आत्मविश्वासपूर्ण इंग्रजी संवाद, स्पष्ट उच्चार आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थित मान्यवर भारावून गेले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे म्हणाले, “इंग्रजी शिक्षण हे केवळ विषयापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग झाले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव यांच्या माध्यमातून हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल.”

जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती ललिता दहीतुले-कावडे यांनी सांगितले की, “‘We Learn English’ हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यांचा प्रभावी संगम असून, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी तो निश्चितच मैलाचा दगड ठरेल. शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास शिक्षण विभाग कटिबद्ध आहे.”

दरम्यान, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत बबन जगताप, उपमुख्याध्यापक रोहिदास बाजीराव मेमाणे, तंत्रस्नेही शिक्षक सुनील जाधव आणि अशोक गोफणे यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास मेमाणे आणि खुटवड मॅडम यांनी केले, तर जगदीश ओव्हाळ यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42
Next Post

मंत्रिमंडळ बैठकीतील ५ मोठे निर्णय! दंडाच्या रकमेपासून ते थेट न्यायालयांच्या स्थापनेपर्यंत अनेक मोठे आणि धोरणातक निर्णय जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp