Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तळीरामांसाठी मोठी बातमी! पुण्यात ३ नाही तर फक्त १ दिवस ‘ड्राय डे’; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रशासनाकडून सुधारित आदेश जारी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 22 October 2026, 16:37

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या ‘ड्राय डे’च्या आदेशात बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश जारी केला आहे. त्यानुसार, आता शुक्रवारी (२३ ऑक्टोबर २०२६) मतदानाच्या दिवशीच अधिसूचित क्षेत्रांमध्ये मद्यविक्री बंद राहणार आहे.

सुधारित आदेशानुसार, शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध असतील. त्यानंतर लागू परवाना नियमांचे पालन करून मद्यविक्री पुन्हा सुरू करता येणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी, या उद्देशाने प्रशासनाने सुरुवातीला तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

यापूर्वीच्या आदेशानुसार, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून २३ ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्णयाला मद्यविक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

 

बुधवारी (२१ ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने मद्यविक्री बंदीच्या कालावधीत बदल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुधारित आदेश जारी केला.

सुधारित आदेशानुसार, अधिसूचित क्षेत्रांमधील देशी व विदेशी मद्यविक्रीची दुकाने, बीअर आणि वाइन शॉप, बार, क्लब तसेच हॉटेलमधील मद्यविक्री शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यानंतर परवान्याच्या नियमांनुसार मद्यविक्री सुरू करता येईल.

दरम्यान, २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बालेवाडीतील अधिसूचित क्षेत्रात स्वतंत्र मद्यविक्री बंदी लागू राहणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भारताचा न्यूझीलंडमध्ये रेकॉर्डब्रेक विजय; २२६ रनचे लक्ष्य करत धडाकेबाज चेझ; न्यूझीलंडला त्यांच्याच घरात धूळ चारली

Thursday, 22 October 2026, 16:55

तळीरामांसाठी मोठी बातमी! पुण्यात ३ नाही तर फक्त १ दिवस ‘ड्राय डे’; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रशासनाकडून सुधारित आदेश जारी

Thursday, 22 October 2026, 16:37

निवडणुकीमुळे पुण्यात ५ गावांचे आठवडे बाजार बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Thursday, 22 October 2026, 16:34

मुंबईकरांचा प्रावास आता होणार सुपरफास्ट! आजपासून सुरु होणार ३ नवे उड्डाणपूल; कोणत्या मार्गाने करता येणार प्रवास?

Thursday, 22 October 2026, 16:19

बातमी प्रसिद्ध होताच दोन दिवस धंदे बंद, नंतर पुन्हा सुरू? कारवाईऐवजी हप्तेवाढीच्या चर्चेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

Thursday, 22 October 2026, 16:08

पुण्यावरून नागपूर गाठायचंय? मोजावे लागणार तब्बल ५ हजार रुपये; खासगी बसेसच्या मुजोरीने प्रवासी त्रस्त

Thursday, 22 October 2026, 16:04
Next Post

भारताचा न्यूझीलंडमध्ये रेकॉर्डब्रेक विजय; २२६ रनचे लक्ष्य करत धडाकेबाज चेझ; न्यूझीलंडला त्यांच्याच घरात धूळ चारली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp