Friday, August 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“दादांना जाऊन ६ महिने झाले, आम्ही संयमाने वाट पहिली आता मात्र”; युगेंद्र पवार आक्रमक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 15:05

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघाताला सहा महिने उलटूनही तपासाचा अंतिम अहवाल जाहीर झालेला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणांनी विलंब न करता सत्य जनतेसमोर मांडावे, अशी मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने युगेंद्र पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात असलेल्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तपासाच्या संथ गतीवर टीका केली. अपघातानंतर अनेक चर्चा झाल्या, विविध पातळ्यांवर चौकशी सुरू असल्याचे सांगितले गेले, मात्र अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

युगेंद्र पवार म्हणाले की, “दादांच्या निधनाला सहा महिने झाले, पण आजही त्या दिवशी नेमकं काय घडलं याचं स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. आम्ही संयमाने प्रतीक्षा केली, मात्र तपासात अपेक्षित प्रगती दिसत नाही. जनतेलाही सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे.”

यावेळी त्यांनी अपघातानंतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित केले. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे कामही अद्याप पूर्ण झालेले नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सीआयडी आणि डीजीसीएकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी अंतिम अहवाल अद्याप प्रसिद्ध न झाल्याने अनेक शंका कायम असल्याचे त्यांनी म्हटले.

 

तपास यंत्रणांनी विलंब न करता अपघाताच्या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, संबंधित निष्कर्ष स्पष्टपणे मांडावेत आणि त्या दिवशी नेमके काय घडले याची माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली. या प्रकरणाचा अंतिम अहवाल लवकर जाहीर व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पोक्सो गुन्ह्याखाली होता फरार

Thursday, 20 August 2026, 22:58

चोरीचा आरोप, पैशांची मागणी अन् धमकी! पुण्यात महिलेच्या छळाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 20 August 2026, 21:57

गणेशोत्सवापूर्वी पुण्यात डीजेच्या डेसिबलची अग्निपरिक्षा! थेट पोलिस आयुक्तालयात घेतली साऊंड टेस्ट

Thursday, 20 August 2026, 21:19

पेरू खाण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; नराधमाला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Thursday, 20 August 2026, 20:33

ओडिशातून गांजा आणणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

Thursday, 20 August 2026, 20:30

लग्न करण्यासाठी खाकी वर्दी घालायची! महिलेचा आरपीएफ अधिकारी असल्याचा बनाव; पोलिसांनी तपासचक्र फिरवली अन् बिंग फुटलं

Thursday, 20 August 2026, 19:54
Next Post

शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा जाळ्यात! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून अटक,SITचा मोठा प्रहार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp