Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पोक्सो गुन्ह्याखाली होता फरार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 August 2026, 22:58

पुणे: बीड येथील राष्ट्रीय पातळीवरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. अटकेची भीती आणि जामीन मिळण्याबाबत निर्माण झालेल्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

तुकाराम करांडे याने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दोन वेळा महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सुमारे १५ दिवसांपूर्वी बीडमधील बार्शी रोड परिसरात अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले होते. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता.

दरम्यान, बीड तालुक्यातील एका गावातील शाळेत क्रीडा प्रशिक्षण देत असताना तुकारामची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. संबंधित मुलगी शिक्षणासाठी बीड शहरात आल्यानंतर तुकाराम आणि त्याच्या मित्रांनी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. मित्रांच्या मदतीने एका कॅफेमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप संबंधित अल्पवयीन मुलीने केला आहे.

या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तुकाराम करांडे बीडमधून फरार झाला आणि पुण्यात आला होता.

 

या प्रकरणात तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर १८ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी होणार होती.

दरम्यान, आधीच अवैध पिस्तूल प्रकरणातील गुन्हा आणि त्यानंतर पॉक्सो कायद्यान्वये दाखल झालेला गंभीर गुन्हा यामुळे आपल्याला जामीन मिळणे कठीण असल्याच्या तणावातून तुकारामने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पुणे आणि बीड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30
Next Post

शुक्रवार ठरणार खास! ‘या’ 7 राशींचं नशीब आज चमकणार; कर्माचं फळ मिळेल, जाणून घ्या आजचं भविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp