Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेशोत्सवापूर्वी पुण्यात डीजेच्या डेसिबलची अग्निपरिक्षा! थेट पोलिस आयुक्तालयात घेतली साऊंड टेस्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 August 2026, 21:19

पुणे: गणेशोत्सवाला अजून काही दिवस बाकी असले तरी पुण्यात उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव आणि या काळात वाजवण्यात येणाऱ्या डीजेचा वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम आहे. गणेश मंडळांचा डीजेसाठी आग्रह, पोलिस प्रशासनाकडून घालण्यात येणारी कायद्याची चौकट आणि पर्यावरणप्रेमींकडून ध्वनिप्रदूषणाविरोधात करण्यात येणारी मागणी, या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी डीजे साउंड सिस्टिमची चाचणी घेतली.

यंदाच्या गणेशोत्सवात डीजे साउंड सिस्टिमवर निर्बंध येण्याची शक्यता असल्याने अनेक गणेश मंडळांनी आक्षेप नोंदवला आहे. दुसरीकडे, डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुरुवारी थेट पोलीस आयुक्तालयात डीजे साउंड सिस्टिमचे टेस्टिंग केले.

यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच पुणे साउंड असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी आणि अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

साउंड सिस्टिममधून निर्माण होणाऱ्या आवाजाची पातळी डेसिबल मॉनिटरच्या माध्यमातून मोजण्यात आली. वेगवेगळ्या संख्येने स्पीकर लावल्यानंतर आवाजाच्या क्षमतेत होणारा बदल, तसेच साउंड सिस्टिममध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘2 बेस, 2 टॉप’ आणि ‘4 बेस, 4 टॉप’ यामुळे आवाजाच्या पातळीत नेमका काय फरक पडतो, याचीही पाहणी करण्यात आली. याशिवाय सध्या स्पीकरमध्ये अनधिकृतपणे वापरल्या जाणाऱ्या ‘प्रेशर मिड’बाबतही पोलिसांनी माहिती घेतली.

 

विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रशांत अमृतकर यांनी सांगितले की, पर्यावरण कायदा आणि ध्वनीप्रदूषणासंदर्भातील कायद्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या डेसिबल मर्यादांचे गणेशोत्सवात पालन व्हावे, यासाठी साउंड सिस्टिमची चाचणी घेण्यात आली. साउंड सिस्टिमचे प्रकार, त्यामध्ये करण्यात येणारे बदल आणि त्याचा आवाजाच्या पातळीवर होणारा परिणाम याबाबत तपासणी करण्यात आली असून, त्यानंतर सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

पुणे साउंड असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत साउंड सिस्टिमच्या वापराबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. साउंडमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे मान्य आहे. मात्र, साउंड सिस्टिममध्ये नेमक्या कोणत्या उपकरणांमुळे हा त्रास वाढतो, हे स्पष्ट करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. यावेळी ब्रँडेड साउंड सिस्टिम लावून त्याच्या आवाजाची मर्यादा तपासण्यात आली.

सध्या काही साउंड सिस्टिममध्ये ‘प्रेशर मिड’ नावाचे उपकरण वापरले जाते. या उपकरणामुळे साउंड सिस्टिमच्या क्षमतेपेक्षा अधिक आवाज निर्माण होतो आणि त्याचा नागरिकांना त्रास होऊ शकतो, असा दावा बबलू रमजानी यांनी केला. ‘प्रेशर मिड’च्या वापराला साउंड असोसिएशनचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करण्याची आमची भूमिका आहे. साउंडचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचेही हित लक्षात घेऊन नियम ठरवले जावेत, अशी भूमिका साउंड असोसिएशनने मांडली आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30
Next Post

चोरीचा आरोप, पैशांची मागणी अन् धमकी! पुण्यात महिलेच्या छळाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp