Friday, August 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चोरीचा आरोप, पैशांची मागणी अन् धमकी! पुण्यात महिलेच्या छळाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 August 2026, 21:57

पुणे: पुण्यातील भोसरी परिसरात पैशांच्या मागणी आणि मानसिक छळाला कंटाळून एका २६ वर्षीय दिव्यांग युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला पैशांसाठी त्रास देत असल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी सरोज माने या महिलेला अटक केली आहे.

मृत युवकाचे नाव विनोद चौधरी असे असून, ही घटना २७ जुलै रोजी भोसरीतील डेस्टिनेशन क्षितिज सोसायटीमध्ये घडली. विनोदने सोसायटीच्या १२व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज माने हिने विनोदवर सोन्याचे झुमके चोरी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. धमकीला घाबरून विनोदने कर्ज काढून संबंधित महिलेला एक लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतरही त्याच्याकडे आणखी ५५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आणि त्याला धमक्या दिल्याचा आरोप आहे.

सततची पैशांची मागणी आणि मानसिक छळाला कंटाळून विनोदने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला पैशांसाठी त्रास देत असल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

 

ही घटना २७ जुलै रोजी घडली असली तरी याप्रकरणी ८ ऑगस्ट रोजी भोसरी पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी सरोज माने हिला अटक केली.

या प्रकरणात सरोज माने हिच्याशिवाय आणखी कोणाचा सहभाग आहे का, पैशांची मागणी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली आणि विनोदला कोणत्या प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या, याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच आत्महत्येपूर्वी विनोदने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओतील माहितीचीही पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे भोसरी परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पोक्सो गुन्ह्याखाली होता फरार

Thursday, 20 August 2026, 22:58

चोरीचा आरोप, पैशांची मागणी अन् धमकी! पुण्यात महिलेच्या छळाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 20 August 2026, 21:57

गणेशोत्सवापूर्वी पुण्यात डीजेच्या डेसिबलची अग्निपरिक्षा! थेट पोलिस आयुक्तालयात घेतली साऊंड टेस्ट

Thursday, 20 August 2026, 21:19

पेरू खाण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; नराधमाला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Thursday, 20 August 2026, 20:33

ओडिशातून गांजा आणणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

Thursday, 20 August 2026, 20:30

लग्न करण्यासाठी खाकी वर्दी घालायची! महिलेचा आरपीएफ अधिकारी असल्याचा बनाव; पोलिसांनी तपासचक्र फिरवली अन् बिंग फुटलं

Thursday, 20 August 2026, 19:54
Next Post

राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पोक्सो गुन्ह्याखाली होता फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp