Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी रेल्वे स्टेशन परिसरात रंगला रम्मीचा अड्डा; पोलिसांच्या धाडीत 4 जण रंगेहात जेरबंद

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 July 2026, 15:49

लोणी काळभोर : लोणी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे रुळालगत झाडाखाली सुरू असलेल्या रम्मी जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी 25 जुलै दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात 4 जणांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईत 1 हजार 900 रुपयांची रोख रक्कम आणि पत्त्यांचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून, सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकुमार यश शिंगोडे (रा. कदमवाकवस्ती), गणेश किसन शेळके (रा. माळीमळा, लोणी काळभोर), विनोद संदिपपान जाधव (रा. केडगाव रेल्वे स्टेशन) आणि जाकीर रसन शेख (रा. लोणी कॉलनी, रेल्वे स्टेशन परिसर) असे रंगेहात पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन भिमराव सोनवणे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने लोणी काळभोर रेल्वे स्टेशन परिसरात अवैध जुगाराविरोधात विशेष मोहीम राबविली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेत घटनास्थळी सापळा रचला.रेल्वे स्टेशनलगत रुळाशेजारी असलेल्या झाडाखाली काही जण पत्त्यांवर पैशांचा डाव खेळत असल्याची खात्री झाल्यानंतर दुपारी सुमारे 3 वाजता अचानक छापा टाकण्यात आला.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पत्ते आणि पैसे टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत राजकुमार शिंगोडे , गणेश शेळके, विनोद जाधव आणि जाकीर शेख यांना ताब्यात घेतले. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 1 हजार 900 ची रोख रक्कम, पत्त्यांचे कॅट आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. पंचांसमक्ष मुद्देमाल सीलबंद करून पोलिसांनी जप्त केला.

 

या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे, अवैध धंद्यांविरोधातील कारवाईचा भाग म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी अलीकडच्या काही दिवसांत जुगार अड्ड्यांवर सलग धाडी टाकत कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

इंदापूरमध्ये तब्बल ६ टन प्रतिबंधित आफ्रिकन मांगूर मासे जप्त; १९ लाखांच्या मुद्देमालासह दोघांवर कारवाईचा बडगा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp