Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूरमध्ये तब्बल ६ टन प्रतिबंधित आफ्रिकन मांगूर मासे जप्त; १९ लाखांच्या मुद्देमालासह दोघांवर कारवाईचा बडगा!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 16:01

आदित्य बोराटे

इंदापूर: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशानुसार प्रतिबंधित असलेल्या आफ्रिकन मांगूर (कॅरियस गॅरिपिनियस) जातीच्या तब्बल सहा हजार किलो (सहा टन) माशांची वाहतूक करणाऱ्यांवर इंदापूर पोलिस व मत्स्यविभाग यांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत १९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जप्त केलेले प्रतिबंधित मांगूर मासे नष्ट करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २५) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास शहा (ता. इंदापूर) येथील इजगुडे वस्ती परिसरातील तळ्याजवळ ही कारवाई करण्यात आली. सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र रूपचंद राठोड (मत्स्यबीज केंद्र, हडपसर, पुणे) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात मनोजकुमार पिरमालु गुरुदास (मूळ रा. आंध्र प्रदेश, सध्या रा. शहा, ता. इंदापूर) आणि आयशर टेम्पो चालक रोहीदास रामचंद्र मंजुळकर (रा. बिजवडी, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आयशर टेम्पो (क्र. MH 42 BU 9559) मधून प्रतिबंधित मांगूर माशांची वाहतूक करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

या कारवाईदरम्यान १५ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो आणि सुमारे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सहा हजार किलो प्रतिबंधित मांगूर मासे असा एकूण १९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर संबंधित विभागाच्या व पोलिसांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेले प्रतिबंधित मांगूर मासे इंदापूर नगरपालिकेच्या कचरा डेपो येथे नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फिर्यादीनुसार, आफ्रिकन मांगूर ही जात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार प्रतिबंधित असून, तिची पैदास, संवर्धन आणि वाहतूक पर्यावरणासाठी धोकादायक मानली जाते. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३ व ३(५), अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ मधील कलम ३, ५ आणि १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

'इंग्रजी ही भीतीची नव्हे, संधींची भाषा'- सीईओ गजानन पाटील, लोणी काळभोरमध्ये 'We Learn English' उपक्रमाचे लोकार्पण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp