Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षक मतदारयादीत ११ कथित बोगस नावे! शाळांच्या मुख्याध्यापकांनी नावे नाकारली; सोलापूर जिल्ह्यात ११ जणांवर गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 20 October 2026, 16:18

सोलापूर : शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयादीत शिक्षक नसलेल्या ११ व्यक्तींची नावे समाविष्ट झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी या व्यक्ती आपल्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी बार्शीचे गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारांची यादी २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मतदारयादीतील काही नावांबाबत संशय व्यक्त करण्यात आला. यासंदर्भातील माहिती समाजमाध्यमांवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या निर्देशानुसार गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी संबंधित अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली.

मतदार नोंदणीसाठी काही अर्जदारांनी पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील एम. जी. गुरुकुल आणि बार्शी तालुक्यातील ज्योतीबाची वाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती. या प्रमाणपत्रांवर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आणि शाळांचे शिक्के होते. १७ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने संबंधित शाळांकडून लेखी माहिती मागवली. त्यानंतर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी संबंधित व्यक्ती शाळेत कार्यरत नसल्याचे कळवले. दोन्ही शाळांकडून मिळालेल्या माहितीनंतर या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

छत्रपती शिवाजी विद्यालयाशी संबंधित अर्जांमध्ये मोहन बाळासाहेब भोसले, अक्षय श्रीहरी चव्हाण आणि तुषार मोहन भोसले यांची नावे आहेत. तर एम. जी. गुरुकुलशी संबंधित अर्जांमध्ये स्वप्निल अंबरूषी कापसे, रोहित बाबासाहेब कापसे, पृथ्वीराज बाळासाहेब कापसे, शुक्राचार्य शाहुराजे बाबर, सुरज युवराज बाबर, सुदेश नवनाथ कापसे, अभिजीत बापू डिसले आणि संतोषी किशोर धेंडे यांचा समावेश आहे. प्रमाणपत्रांवरील स्वाक्षऱ्या आणि शिक्के खरे आहेत की बनावट, हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि हस्ताक्षरतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32

दादर स्थानक आता ‘चैत्यभूमी’ नावाने ओळखले जाणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; कोट्यवधी अनुयायांची मागणी होणार पूर्ण

Wednesday, 18 November 2026, 19:30

पुण्यात भरवस्तीत संशियितरित्या फिरत होते दोघे; पोलिसांनी विचारपूस करत झडती घेताच असं काही सापडलं की…

Wednesday, 18 November 2026, 19:16

नागरिकांच्या मागणीनंतर आमदार माऊली आबा कटके यांच्या सूचनेनुसार घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू; १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात!

Wednesday, 18 November 2026, 19:03

शायना एनसींच्या कृतीने वाद पेटला! बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री शिंदें मैदानात, शिवसैनिकांना स्पष्ट सांगितले…

Wednesday, 18 November 2026, 18:27
Next Post

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा रस्त्यावरच तुफान राडा! महिला पोलिसालाच लायटर मागितलं अन् नकार देताच चापट मारत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp