Washim News : वाशिम : शेतकऱ्याच्या एका म्हशीने चक्क अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत गिळल्याची धक्कादायक घटना वाशिमच्या सारसी गावात उघडकीस आली आहे. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला. ही घटना नेमकी कशी घडली? पोत कशी काढली? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा
सार्सी येथील शेतकरी रामहरी भोयर हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्याकडे बैल, गाय, म्हैस अशी गुरेढोरे आहेत. खरीप हंगाम असल्याने ते सध्या शेतात सोयाबीन, तूर, उडीद ही पिके घेत आहेत. सोयाबीनला लागलेल्या शेंगा ते घरी घेऊन आले होते. (Washim News) त्यांच्या घरातील महिलांनी भाजी करण्यासाठी सोयाबीन शेंगा सोलून त्याची टरफले ताटात काढली. दरम्यान रात्री झोपताना गळ्यातील दोन तोळे वजन असलेली सोन्याची पोथ अनावधानाने त्याच ताटात राहिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेंगाची टरफले म्हशी समोर खाण्यासाठी ठेवली. या शेंगाच्या टरफलासोबत सोन्याची पोथ देखील म्हशीच्या खाण्यात गेली. गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोथ न दिसल्याने गिताबाई भोईर ह्या चक्रावून गेल्या. पोथ तुटून पडली की चोरीला गेली? हे त्यांना कळेनासे झाले. (Washim News) त्यामुळे त्यांनी आपले पती रामहरी भोयर यांना गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत दिसत नसल्याचे सांगितले.
त्यानंतर पोत म्हशीच्या खाण्यात तर गेली नाही ना? अशी शंका त्यांना आली. पत्नी गीताबाई भोयर दोन तोळ्यांची सोन्याची पोत कुठे पडली या चिंतेत होत्या. त्यानंतर आपण ताटात सोन्याची पोथ ठेवली होती, म्हशीने चाऱ्या सोबत खाली तर नाही ना? अशी शंका त्यांना येऊ लागली. (Washim News) यानंतर त्यांनी आपल्या म्हशीला जनावराच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मेटल डिटेक्शनवरून म्हशीच्या पोटात सोन्याची पोथ असल्याची खात्री केली. एक दिवस वाट बघितली आणि दुसऱ्या दिवशी भोयर यांनी म्हशीची सोनोग्राफी केली. त्यानंतर म्हशीची शस्त्रक्रिया करुन म्हशीच्या पोटातील दोन तोळ्याची सोन्याची पोथ काढण्यात आली. यानंतर भोयर परिवाराचा जिवात-जीव आला.
दरम्यान, शेतकरी भोयर म्हणतात कि, या सोन्याच्या पोथीची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये आहे. तर ऑपरेशननंतर सध्या म्हशीची तब्येत व्यवस्थित असून ती चारा खात आहे. (Washim News) जनावरांना चारा टाकताना काळजी घेण्याचं आव्हान डॉक्टरांनी केलं. चित्रपटाला लाजवेल अशा वास्तविक घटनेनंतर जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune news : पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार
Pune News : पीएमपी बसचे गणेशोत्सवात ‘रेकॉर्ड ब्रेक’ उत्पन्न..
Pune News : निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या ; पुण्यात प्रचंड खळबळ..