Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलींना बीफ दिलं, बुरखा घातला तेव्हा कुठे होता?” नवनीत राणांचा प्यारे खान यांच्यावर हल्लाबोल; म्हणाल्या “कुराण बाजूला ठेवून संविधान हातात घेणार का?”

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 April 2026, 19:27

अमरावती: परतवाडा येथे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

दरम्यान, या घटनेवर भाष्य करताना भाजप नेत्या नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणाला गंभीर स्वर देत “राज्यात लव्ह जिहादसारखे प्रकार सुरू असताना काही लोक गप्प का बसतात?” असा सवाल उपस्थित केला.

नवनीत राणा यांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यावरही थेट निशाणा साधला. “नाशिकमध्ये मुलींना बीफ दिलं, बुरखा घालायला लावला, अमरावतीत कोल्हे प्रकरण घडलं तेव्हा प्यारे खान कुठे होते? राज्यात अशा घटना घडतात तेव्हा ते पुढे का येत नाहीत?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

तसेच, “प्यारे खान यांनी कुराण बाजूला ठेवून संविधान पुढे ठेवणार का?” असा थेट सवालही त्यांनी केला. “तुम्ही एका जबाबदार पदावर आहात, त्यामुळे आधी समाजाची माफी मागा आणि नंतर माझ्याविरोधात तक्रार करा,” असेही राणा म्हणाल्या.

या प्रकरणातील मुख्य आरोपीबरोबरच त्याच्या वडिलांनाही सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली. “परिसरातील माहितीनुसार आरोपीच्या वडिलांकडूनही या कृत्याला प्रोत्साहन दिलं जात होतं. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, “लॅपटॉप जप्त झाल्यावर या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर येतील. किती मुलींना फसवलं गेलं, याचा पूर्ण उलगडा होईल,” असा दावाही नवनीत राणा यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून विविध नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असून पुढील माहिती तपासानंतर समोर येणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Yavat Crime News : वरवंडमध्ये पिण्याच्या पाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये राडा ; तरुणाच्या डोक्यात दगड घालून केली मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल..

Tuesday, 21 April 2026, 16:01

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29
Next Post

मोदी सरकारला लोकसभेत मोठा धक्का! महिला आरक्षणाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर; लोकसभेत बहुमताअभावी 131व्या घटनादुरुस्तीला ब्रेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.