Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime News : वरवंडमध्ये पिण्याच्या पाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये राडा ; तरुणाच्या डोक्यात दगड घालून केली मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 21 April 2026, 16:01

यवत, (पुणे) : पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका 22 वर्षीय तरुणाला दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना उघडकी स आली आहे. वरवंड (ता. दौंड) येथील गोपीनाथनगर परिसरात घडली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बाळासाहेब विनायक शितोळे व भालचंद्र बाळासाहेब शितोळे (दोन्ही रा. वरवंड ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम गणेश खेडकर (वय-22, रा. वरवंड, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम खेडकर आणि आरोपी बाळासाहेब शितोळे हे एकमेकांचे शेजारी आहेत. परिसरातील ‘मम्मी रणधीर’ (पूर्ण नाव माहित नाही) नावाच्या एका महिलेसोबत आरोपींचा जुना वाद आहे. 18 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शुभमने त्या महिलेकडून पिण्याच्या पाण्याचा पाईप घेतला होता. ही बाब आरोपींना खटकली.

शुभमने त्या महिलेकडून पाईप का घेतला आणि तो तिला मदत का करतो, याचा राग मनात धरून आरोपी बाळासाहेब शितोळे आणि भालचंद्र शितोळे यांनी शुभमला गाठले. “तू त्या मम्मीची बाजू का घेतोस? तिचे पाणी का भरतोस? तुला लय माज आलाय का? तुला सांगितलेले कळत नाही का?” असे म्हणत आरोपींनी शुभमला अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली.

दरम्यान, वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही आरोपींनी शुभमला हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी तिथेच पडलेला एक दगड उचलून शुभमच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यवत पोलीस करीत आहेत.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर चिमण्यांना दिलासा ; पिंपरी दुमाला शाळेचा स्तुत्य उपक्रम

Tuesday, 21 April 2026, 17:02

शिंदवणे ग्रामस्थांनी श्रमदानातून स्मशानभूमीचा केला कायापालट ; अस्वच्छ परिसर झाला देखणा

Tuesday, 21 April 2026, 16:56

Loni Kalbhor : कदमवाकवस्ती येथे झालेल्या अपघातात बारामतीत सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू..

Tuesday, 21 April 2026, 16:43
Crime News: 'I don't want to come to the onion poha program' Terrible thing happened to the young man after he refused to see the girl; Three people met him on the road and...

Baramati Crime News : शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; नांगरट करणाऱ्या ट्रॅक्टरचीही तोडफोड, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Tuesday, 21 April 2026, 16:35

Yavat Crime News : वरवंडमध्ये पिण्याच्या पाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये राडा ; तरुणाच्या डोक्यात दगड घालून केली मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल..

Tuesday, 21 April 2026, 16:01

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57
Next Post
Crime News: 'I don't want to come to the onion poha program' Terrible thing happened to the young man after he refused to see the girl; Three people met him on the road and...

Baramati Crime News : शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; नांगरट करणाऱ्या ट्रॅक्टरचीही तोडफोड, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.