Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! ‘तुला वर्षभरापासून मुलबाळ होत नाही, तू माझ्यासोबत..” भाजप नेत्याकडून महिलेचा विनयभंग; बदनामीची धमकी दिली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 June 2026, 18:46

चंद्रपूर: विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. गोंडपिपरी तालुका भाजपचे महामंत्री भानेश येग्गेवार यांच्यावर १९ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी भंगाराम तळोधी येथे भानेश येग्गेवार यांच्या शेतात कापूस बियाण्यांची पेरणी सुरू होती. बियाणे संपल्याने तक्रारदार महिला आणि भानेश येग्गेवार हे बियाणे आणण्यासाठी गावातील साळूच्या घरी गेले होते.

तक्रारीनुसार, घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने महिलेचा विनयभंग केला. “तुला वर्षभरापासून मूलबाळ होत नाही. मी तुला मूल करून देतो,” असे म्हणत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिला बदनामी करण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिला स्थानिक मराठी भाषा नीट अवगत नसल्यामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. अखेर कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या मदतीने २७ जून रोजी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारीनंतर पोलिसांनी भानेश येग्गेवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून ते सध्या फरार आहेत. गोंडपिपरीचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

Wednesday, 29 July 2026, 23:06

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; ‘या’ दिवशी होणार विवाह

Wednesday, 29 July 2026, 22:40

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15
Next Post

"‘नशामुक्त लोणी काळभोर’चा संदेश; विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, अंमली पदार्थ व सायबर गुन्ह्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसांची जनजागृती"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.