पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा सोहळा पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला. या सोहळ्यास मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रीत करण्यात आलं होत.

या साखरपुड्यास पवार कुटुंबीय आणि शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, निलेश लंके, शशिकांत शिंदे व दत्ता भरणे यांसारख्या प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवून भावी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

कायनात दारा या मुळच्या चंदीगढच्या आहेत. सध्या त्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी द ब्रिटीश स्कूल चाणक्यनगरी दिल्ली येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या NDTV या संस्थेत आऊटपूट एडिटर आणि रिपोर्टर म्हणून कार्य केले.
पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाहसोहळा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. खासदार पार्थ अजित पवार यांच्या जीवनसाथी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिणी पवार यांच्या सून म्हणून त्या सार्वजनिक जीवनात प्रवेश करीत आहेत.







