पुणे : महाराष्ट्र शासनाची अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या राज्यभरातील महिलांच्या चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते. मागील जून महिन्याचा हप्ता महिलांना 15 जुलैच्या सुमारास मिळाला होता. आता जुलै महिना संपत आला तरीही या महिन्याचे पैसे खात्यात जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणी हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

जुलै महिन्याचे हे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार, याविषयीची एक मोठी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता महिलांना ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारकडून सहसा दरमहा 10 तारखेच्या आसपास योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचे नियोजन केले जाते. याच नियोजनानुसार, 15 ऑगस्टपूर्वी जुलैचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.

दरम्यान सरकारकडून जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही अंतिम किंवा अधिकृत तारीख घोषित करण्यात आलेली नाही.लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त शासकीय अधिकृत माहिती आणि प्रशासकीय घोषणांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील असा अंदाज असून लवकरच यावर अधिकृत निर्णय अपेक्षित आहे.






