वर्धा : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु आहे. या दरम्यान अनेक भागातून एकमेकांना मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना वर्धा येथून समोर आली आहे. वर्ध्यात शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तरांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती नितेश कराळे यांनी दिली आहे. या मारहाणीनंतर कराळे मास्तरांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु आहे. या दरम्यान बीडमधील परळी विधानसभा मतदार संघात मारहाण केल्याची घटना घडली आहे. याचप्रकारे विविध भागात मारहाणीच्या घटना घडत असताना वर्ध्यात सुद्धा शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तरांना मारहाण करण्यात आली आहे. याबाबत कराळे मास्तर यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.