अकोला : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चांगलीच चर्चा रंगत आहे. फार कमी कालावधीमध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला असून थेट त्यांच्या बँक खात्यात ही लाभाची रक्कम जमा झाली आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी गैरमार्गाने सुद्धा घेण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार उघड झाला आहे.
अकोला जिल्ह्यातून 6 जणांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटा कागदपत्रे जमा केल्याचं प्रकरण आता समोर आलं आहे. याबाबत, अकोला जिल्ह्यातील महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, या घटनेतील 6 लाडक्या भावांवर कारवाई करत त्यांचे आधारकार्ड निलंबित करण्यात आल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोल्यात या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न चक्क सहा ‘लाडक्या भावां’नी केला सलूनचे समोर आले आहे. या योजनेसाठी असलेल्या ‘नारीशक्ती दूत’ अॅपवर अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरला असल्याचे, अर्जाच्या छाननीमध्ये समोर आले आहे. यात या सहा पुरुषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सहाही जणांकडून याचा खुलासा मागविण्यात आला असून त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणारे आहे.
दरम्यान, या योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती अकोला जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच..
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार असून या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली.