Samriddhi Highway accident : बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. आज मंगळवारी सकाळी झालेल्या दुर्देवी अपघातात दोन प्रवासी ठार झाले आहेत. खासगी बसचा चालक टायरमधील हवा तपासायला खाली उतरला असता मागून येणाऱ्या मालवाहक वाहनाने त्याला धडक दिली आणि हा विचित्र अपघात घडला.
मुंबईवरून नागपूरला जाताना अपघात
गणराज ट्रॅव्हल्सची बस ही मुंबईवरून नागपूरला जात होती. दरम्यान, मेहकर नजीक बसच्या टायरची हवा चेक करण्यासाठी चालक खाली उतरला होता. याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. यात बस चालक जागीच ठार झाला असून बसमधीलच एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बसमधून एकूण ३७ प्रवासी प्रवास करित होते.
टेम्पो ट्रकची धडक
याआधी शनिवारी (१४ ऑक्टोबर) मध्यरात्री समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला होता. . या अपघातात ६ वर्षांच्या एका चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार झाले होते. बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात २३ जण जखमी झाले होते. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण ३५ प्रवासी होते.