यवतमाळ: मृदू आणि जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. स्थापत्य अभियंता पदाकरिता भरती घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी होत्या. त्यात काही जणांना अटकसुद्धा झाली होती. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश मंत्री संजय राठोड यांनी दिला. ही भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत करण्यात आली होती. या परीक्षेला 52 हजार 690 विद्यार्थी बसले होते.