Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाण्याअभावी उतरली कलिंगडाची ‘लाली’; शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी, लाखो रुपयांचा फटका

गणेश सूळby गणेश सूळ
Friday, 15 March 2024, 17:58

गणेश सुळ

केडगाव  : उन्हाच्या कडाक्यात कलिंगडाला सोन्याचा भाव आला होता. त्यामुळं कलिंगड उत्पादक शेतकरी आनंदात होता. चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा देखील शेतकऱ्यांना होती. मात्र, अचानक पाणी कमी पडू लागले. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे अवघड झालं आहे.

दौंड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली होती. लागवडीपासून ते काढणीपर्यंत लाखो रुपयांचा खर्च केला होता. परंतु कलिंगड काढणीला येण्याअगोदर एक-दोन पाण्याची आवश्यकता असताना विहिरी, ओढे, नाले, तलाव, कूपनलिका कोरड्या पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळं कलिंगड पिकाला पाणी मिळत नसल्याने पीकाची शेतातच नासाडी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कलिंगडला चांगला बाजारभाव मिळून दोन पैसे हातात येतील, या आशेने शेतकरी दिवसरात्र एक करुन कलिंगडाचे संगोपन करत होते. त्यांच्या कष्टाला यशही मिळाले. मात्र, शेवटी एक दोन पाण्याअभावी कलिंगडाची अक्षरशः नासाडी झाली.

दरम्यान, दिवसरात्र मेहनत घेऊन उत्पादन घेतलेल्या कलिंगड लागवडीतून चांगले आर्थिक उत्पादन अपेक्षित होते. रात्रदिवस काबाड कष्ट करुन शेतकऱ्यांनी जोमात पीक आणले होते. या कलिंगड पिकातून लाखांचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र, बाजारपेठेत कलिंगडला चांगला भाव मिळत आहे. पण, पाण्याअभावी त्यांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. त्यामुळे कलिंगडाच्या वजनात वाढ होईना. या दुष्काळजन्य परिस्थितीने, लागवड केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

पाण्याची मागणी करूनही पाणी नाही

दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाणी दौंड तालुक्यात पोहचले होते. परंतु, आम्ही पाण्याची मागणी करून देखील आम्हाला पाणी न देता इंदापूर तालुक्यात नेण्यात आले. पिकाची नासाडी होत आहे, शेवटी एका पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कलिंगडाचे पीक जमीनदोस्त होत आहे. पिकाची केलेल्या खर्चाच्या तुलनेत वाढ होत नाही, असे पाटबंधारे विभाग यांना कळविण्यात आले होते.

– दादा खोमणे, शेतकरी गाडेवाडी (दौंड)

स्वतः माहिती घेऊन लक्ष देण्याचे आश्वासन

खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये अगोदरच पाणीसाठा कमी असताना देखील दौंड तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु नियमानुसार अगोदर इंदापूरसाठी 25 दिवस पाणी सोडण्यात येते. त्यानतंर दौंड तालुक्यातील गावांना पाणी सोडण्यात येते. या शेतकऱ्याची गरज पाहून त्यासंदर्भात मी स्वतः माहिती घेऊन या विषयात लक्ष देते.

– श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे (खडकवासला)

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post
vacancy in pune air force school pune

यवतमाळमध्ये मृदू आणि जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp