अकोला : अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) कारने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात बोरगावमंजू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. उपनिरिक्षक मोरे हे बोरगाववरून मुर्तिजापूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाने त्याच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात मोरेंचा जागीच मृत्यू झाला.
बातमी अपडेट होत आहे…