नागपूर : ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या एकानराधमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात चांगली नोकरी लागल्यानंतर प्रेयसीला आणि तिला दिलेल्या लग्नाचा वचणाला वाऱ्यावर सोडणाऱ्या एका प्रियकराविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नमन संगोत्रा (22, रा. द्विवेदी कॉलनी, गोरेवाडा रोड, गिट्टीखदान) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
नमन आणि 22 वर्षीय तरुणी हे एकाच ठिकाणी काम करत होते. दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे तरुणीच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे ती आपल्या मावशीकडे राहत होती. ते दररोज एकाच बसमध्ये ये-जा करीत असल्यामुळे त्यांच्या संपर्क होता. याच संधीचा फायदा घेत नमनने तरुणीला अनेक आश्वासन दिले. नमनने युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, नमनला तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता तो कायम उडवा-उडावीचे उत्तर देत होता. काही दिवसांनंतर नमन पुण्याला निघून गेला. पुण्यातही त्याने युवतीला बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने पुन्हा नमनला लग्नाबाबत विचारणा केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यावेळी नमनने लग्नास नकार देऊन दिला. दोघांमध्ये वाद झाला. या वादात नमनने तरुणीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तरुणीने हिम्मत करत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि नमन विरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली.